शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील राजे शिवछत्रपती बालोद्यान मधील तुटलेली संरक्षण जाळी दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठान आकुर्डी संस्थापक/अध्यक्ष निखिल दळवी यांनी अ क्षेत्रीय कार्यालय निगडी पुणे 44 कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 14 मधील व्यापार संकुल शेजारील राजे शिवछत्रपती बालोद्यान मधील कंपाउंड वॉल वरील तारेची संरक्षण जाळी (लांबी अंदाजे 20 ते 25 फुट) आहे. तसेच कंपाऊंड वॉल ला लागून सांडपाण्याचा नाला आहे. सदर उद्यान लहान मुलांच्या करमणुकीसाठी बनवण्यात आलेले असून, दररोज त्याठिकाणी लहान मुले खेळण्यास येतात. कंपाउंड वॉल ची जाळी तुटल्यामुळे शेजारी नाल्यांमध्ये लहान मुले वाकून बघतात व त्या भिंतीवर उभे राहतात. असे आमच्या निदर्शनास आले आहे. खेळता-खेळता लहान मुले भिंतीवरून नाला मध्ये वाकून बघताना किंवा भिंतीवरती उभे राहिल्यामुळे तोल जाऊन नाल्यांमध्ये पडून अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. तरी आपण उद्यानामधील तारेचे कंपाउंड वॉल ची दुरुस्ती कोणताही अपघात होण्यापूर्वी करून घ्यावी, व लवकरात लवकर कंपाउंड वॉल ची जाळी बसवून घ्यावी, असेही दिलेल्या निवेदनात निखिल दळवी यांनी म्हटले आहे.