शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
बो-हाडेवाडी | प्रतिनिधी
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाने व नगरसेविका सारिकाताई नितिन बो-हाडे यांच्या प्रयत्नातुन वूडसविल्हा मेन रोड महापालिकेच्या जागे मध्ये लवकरच जेष्ट नागरिकांसाठी विरूगंळा केंद्र,वाचनालय,सांस्कृतिक हाँल,व 1एकर मध्ये उद्यान (garden ) विकसित होणार आहे. या विकसित उपक्रमाचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
आज अधिकाऱ्यांसोबत नगरसेविका सारिकाताई नितिन बो-हाडे यांनी पाहणी केली.आमदार महेशदादा लांडगे यांच्या शुभहस्ते लवकरच कामाचे भुमीपुजन होणार आहे. बो-हाडेवाडी मध्ये आज पर्यत उद्यानासाठी जागा आरक्षित नव्हती.2017 मध्ये नगरसेविका झाल्यानंतर आमदार महेशदादा च्या मार्गदर्शनाने गेल इंडिया शेजारील प्राधिकरणाची मोकळी जागा घेण्याची ठरले.त्या साठी महापालिकेच्या नगररचना विभागा मार्फत प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरवा केला. कुठे काही अडचण आल्यावर आमदार महेशदादा लांडगे स्व ता प्राधिकरण च्या आँफिस मध्ये येऊन त्या वर मार्ग काढत असे. नंतर जागा महानगरपालिकेच्या च्या ताब्यात आल्यानंतर . कोविड -१९ महामारी मुळे काम करण्यासाठी उशिर झाला.पण आत्ता पंधरा दिवसाच्या आत मध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे.यामुळे बो-हाडेवाडी आजुबाजुच्या परिसरात सोसायटी वर्ग व नागरीवस्ती मधिल नागरिकांना फायदा होणार आहे. अशी माहिती नगरसेविका सारिकाताई नितिन बो-हाडे यांनी दिली.