शबनम न्युज | मुंबई
अभिनेते सलमान खान यांच्या घराबाहेर नुकतेच काहीजणांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. ही घटना 14 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने संशयित आरोपी विकी गुप्ता याचा भाऊ सोनू गुप्ता याला ताब्यात घेतली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. या गोळीबार प्रकरणात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आला आहे.
संशयीत आरोपी सागर पालवर गॅंग स्टार चा प्रभाव होता आणि त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी गँगच्या संपर्कात आला. तिथून त्याला सलमान खानच्या बाहेर गोळीबार करण्याची सुपारी मिळाली होती. हे मोठे काम असून त्यांना त्याचे चांगले पैसे मिळतील, असे संशयित आरोपींना सांगण्यात आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Advertisement