शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 यमुनानगर निगडी मध्ये गणेश मुर्ती विसर्जन व कोरोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावाचा प्रश्न लक्षात घेता यमुनानगर येथील माणुसकी फाऊंडेशन (पिं.चिं.शहर) व सुवर्णयुग मित्र मंडळ, यमुनानगर च्या वतीने पाचव्या, सातव्या, नव्या व दहाव्या दिवशी (चालत्या – फिरत्या/स्थाईक) विसर्जन कुंडाचे आयोजन करण्यात आले होते.
यामुळे लोकांना स्वताच्या घराजवळच आपल्या बाप्पांना निरोप देण्यास मदत झाली.या उपक्रमामुळे नदी,तलाव व मुख्य विसर्जन कुंडावर होणारी गर्दी जास्तीतजास्त प्रमाणात टाळता आली.या गणेश उत्सवात सर्व गणेशभक्तांनी गणेश उत्सव तर दणक्यात साजरा केलाच पण एक पाऊल पुढे टाकुन गर्दी टाळून कोरोना सारख्या महामारीचा ही सामना केला. असे मत यावेळी राष्ट्रवादीचे प्रसाद कोलते यांनी व्यक्त केले.