शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपलय कार्याने ठसा उमवटणार्या सामाजिक कार्यकर्ते इखलास सय्यद यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबत नियुक्तीचे पत्र शहराध्यक्ष श्री संजोग वाघेरे पाटील यांनी दिले.
आकुर्डी भागात तळागाळात आणि घराघरात पोहोचलेला कार्यकर्ता अशी इखलास सय्यद यांची ओळख असून ते राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे मामे बंधू आहेत. गेल्या वीस वर्षांत सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केली असून भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ध्येय धोरणे , विचार प्रभावी पणे रुजवतील अशा विश्वास अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी आपुलकी ज्येस्ट नागरिक संघाचे अध्यक्ष श्री आण्णा कुऱ्हाडे, कार्यध्यक्ष ज्ञानेश्वर ननावरे, श्री संत सेवा प्रतिष्टान चे अध्यक्ष सुभाष चौधरी व प्रवीण पवार आदी उपस्थित होते. पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडू असे इखलास सय्यद यांनी यावेळी सांगितले सरचिटणीस पदी नियुक्ती झालंयबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.