शबनम न्यूज | पुणे
पुणे। प्रतिनिधी
पुणे विभागातील 18 लाख 50 हजार 399 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 17 हजार 640 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 670 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 39 हजार 571 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 3 हजार 950 रुग्णांपैकी 10 लाख 77 हजार 34 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 449 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 467 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.56 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 33 हजार 995 रुग्णांपैकी 2 लाख 20 हजार 411 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 824 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 760 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 89 हजार 220 रुग्णांपैकी 1 लाख 80 हजार 6 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 481 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 88 हजार 203 रुग्णांपैकी 1 लाख 78 हजार 333 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 916 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 954 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 2 हजार 272 रुग्णांपैकी 1 लाख 94 हजार 615 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 657 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 964 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 936, सातारा जिल्ह्यात 622, सोलापूर जिल्ह्यात 641, सांगली जिल्ह्यात 574 तर कोल्हापूर जिल्ह्यात 191 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 997 आहे. पुणे जिल्हयामध्ये 853 , सातारा जिल्हयामध्ये 707, सोलापूर जिल्हयामध्ये 594, सांगली जिल्हयामध्ये 620 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 223 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 45 लाख 43 हजार 706 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 17 हजार 640 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.