शबनम न्युज | भोसरी
भोसरी दौरा दरम्यान शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते इंद्रायणी नगर येथे जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवाजी आढळराव पाटील यांनी कार्यालयाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी शहराध्यक्ष राष्ट्रवादी अजित गव्हाणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजय फुगे, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव, भाजप उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड नंदकुमार दाभाडे, प्रभाग अध्यक्ष अश्विनी कोठाळकर, भाजपा जिल्हा सचिव गिताताई महेंदृ, सामाजिक कार्यकर्ता मिनाक्षी हांडे, सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत मुरकुटे, अपूर्व आढळराव, रोहिदास गवारे, शिवाजी राजगुरु, रामदास गाढवे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
Advertisement