शबनम न्युज | मुंबई
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा मुक्काम वाढला असून त्यांची दिवाळी कारागृहातच होणार आहे. पुढील सुनावणी आता २ नोव्हेंबर ला होणार आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
आता राऊतांची न्यायालयीन कोठडी वाढल्याने त्यांना कारागृहातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली.
Advertisement