शबनम न्युज | खडकी
अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलनच्या वतीने, वतीने संपूर्ण भारतातील विविध राज्यांतील अग्रवालांना जोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 24 ते 25 डिसेंबर दरम्यान महाअधिवेशनचे आयोजन डेक्कन कॉलेज ग्राऊड, खडकी,येरवडा येथे करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गोपाल शरण गर्ग, राजेश अग्रवाल, शिवकांत केतन, अनूप गुप्ता, अजय अग्रवाल यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्रांतीय अधिवेशन 2022 अंतर्गत शनिवार 24 डिसेंबर 2022 रोजी महिला अधिवेशन, युवक अधिवेशन, व्यवसाय अधिवेशन, व्यापार / उद्योग भव्य प्रदर्शन, अग्रवाल गॉट टॅलेंट एंटरटेनमेंट आणि रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी मुख्य प्रांतीय महाअधिवेशन व अग्र पुरस्कारांचे वितरण + सामाजिक खुला मंच (चर्चा सत्र) होणार आहे.अग्ररत्न, अग्र विभूषण, अग्र भूषण, अग्रश्री, माता माधवी, युवा रत्न सन्मान अशा अनेक अग्रगण्य पुरस्कारांचे वितरण या संमेलनात होणार आहे.