शबनम न्युज | पिंपरी
शेअर मार्केट मधील गुंतवणुकीवर अधिक पैसा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 22 लाख 80 हजारांची फसवणूक करण्यात आली. पिंपळे सौदागर येथे 30 जानेवारी ते 21 फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली. 46 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी शनिवार (दि. 4) रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार सलीम रामजी मेलीस्सा आणि त्यांचे संशयीत साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयतांनी फेसबुक वर गुंतवणुकी संदर्भात जाहिरात दिली. त्यानंतर फिर्यादीशी संपर्क साधून त्यांना एका व्हाट्सअँप ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. शेअर मार्केटमध्ये संशयित सांगतील त्या शेअरवर पैसे गुंतवायचे त्यातून अधिक पैसे मिळतील, असे आमिष दाखवून फिर्यादीला पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या माध्यमातून संशयित यांनी 22 लाख 80 हजारांची गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक केली. पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील तांबे याबाबत अधिक तपास करीत आहेत.