कार्यक्षम नगरसेवक दत्ता काका साने यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चिखली | प्रतिनिधी
स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र यश साने आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा चालवत आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.
पिंपरी चिंचवडचे कार्यक्षम नगरसेवक स्व. दत्ता (काका) साने यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहरात भव्य रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. . दत्ता काकांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र चि. यश साने आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 250 जणांनी रक्तदान करून या रक्तदान शिबिरास यशस्वी केले.
तसेच या शिबिरामध्ये नागरिकांच्या नेत्रतपासणी करण्यात आल्या तसेच या नेत्र तपासणी नंतर आवश्यक असणाऱ्या नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
तसेच या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराच्या निमित्ताने गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावरील हास्य या शिबिरास यशस्वी करत असल्याचे दिसले विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप शिबिरात उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराच्या प्रसंगी राष्ट्रवादी च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर , पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक मयूर कलाटे, नगरसेवक विक्रांत लांडे , नगरसेवक रवि लांडगे, नगरसेवक संजय नेवाळे, नगरसेविका वैशाली ताई काळभोर, राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हा निरीक्षक कविता अल्हाट, निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश माने, उत्तम आल्हाट, नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे, आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांचे यश दत्ता काका साने यांनी आभार व्यक्त केले.