शबनम न्यूज | पुणे
पुणे लोकसभा मतदारसंघात ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांच्या उमेदवारीमुळे पुणे शहरात एम आय एम पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. ऑऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षांमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होत आहे.
यामध्ये महिला कार्यकर्त्या मागे नाही, नुकतेच ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षात अनिस सुंडके यांच्या उपस्थितीत बंधन बँक तथा सूर्योदय मायक्रो फायनान्स कंपनी बचत गटाच्या अध्यक्ष रेहाना सरताज अन्सारी यांनी प्रवेश केला, त्यांच्यासोबत अनेक त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पक्षात प्रवेश घेतला. यावेळी एमआयएम पक्षाचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार अनिस सुंडके , जिल्हा अध्यक्ष फयाज शेख, युवक अध्यक्ष पुणे शहर शाहिद शेख, महिला कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य रुहीनाझ शेख आणि युवक उपाध्यक्ष पुणे शहर मोबीन खान आदी मान्यवर पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.