शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील अल्पसंख्यांक सामाजातील उर्दू हायस्कूल, उर्दू शिक्षक भरती, मुस्लिम व ख्रिश्चन कब्रस्तान साठी प्रमुख बैठक मा.मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान साहेब यांच्या सोबत आज मुंबई येथे बैठक झाली.
Advertisement
Advertisement
मा.मंत्री.मा.आरिफ नसीम खान यांना आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यांक विभाग) च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी, प्रदेश उपाध्यक्ष मा. विनोद सोलंकी, पच्छिम महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मा. नदिम शफी मुजावर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शाहाबुद्दीन शेख, पुणे शहर कार्याध्यक्ष मा. एजाज भाई सय्यद, सामाजिक सल्लागार मा. फारूख वकिल उपस्थित होते.
Advertisement
Advertisement