शबनम न्यूज , प्रतिनिधी ;
पुणे लोकसभा मतदारसंघात ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनिस सुंडके यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत पुण्यातील महात्मा फुले मैदान, नाना पेठ येथून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. या मोटरसायकल रॅलीमध्ये असंख्य युवकांचा सहभाग पहावयास मिळाला ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने पुणे लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्यात येत आहे आज मोठे शक्ती प्रदर्शन करत अनिस सुडके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अखिल मुजावर, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष फयाज शेख, युवक शहराध्यक्ष शाहिद शेख ,प्रवक्ते अंजुम इनामदार , जुबेर मेमन यांच्या सह आदी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहराच्या विकासासाठी तसेच युवकांना रोजगार मिळावा, पुणे शहरातील अनेक प्रश्न सुटावे याकरिता आपली उमेदवारी असल्याचे अनिस सुंडके यांनी यापूर्वीच सांगितले आहे.