शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०७ फेब्रुवारी) ;- पिंपरी-चिंचवड शहरात दि.६ /0२/२२ रोजी प्रभाग २१ मधील क्रांतीनगर,दत्तवाडी,विठ्ठलवाडी भागातील सर्व महिला बचतगट व इतर महिलांसाठी अजित शितोळे यांच्यावतीने हळदी कुंकुवाचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात चैतलीताई देसाई (थॉय इन बॉक्सिंग महाराष्ट्र वूमन कोच),मोहिनीताई टेकावडे,रेश्माताई शितोळे,राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष आशाताई शिंदे,अजितभाऊ शितोळे,आण्णा कुऱ्हाडे(अध्यक्ष-आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ) आर जी जाधव प्रमुख उपस्थित होते.
अजित शितोळे यांचे महिलांनी औक्षण केले. जवळपास १४५० महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन जिन्नत इनामदार व सुजाता घाडगे महिला मंडळ संघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष चौधरी यांनी केले. सर्व उपस्थितांचे अजित शितोळे यांनी सर्वांचे आभार मानले.