शबनम न्यूज | शिरुर
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचार दौरा सुरू आहे या प्रचार दौऱ्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.- भोसरी गावचे ग्रामदैवतश्री भैरवनाथ मंदिरयात्रा निमित्त आढळराव पाटील यांनी मंदिराला भेट दिली. प्रसंगी शाल श्रीफळ देऊन त्यांचे आदर सत्कार करण्यात आले.- पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत आढळराव पाटलांचे स्वागत केले. तसेच
नगरसेवक एड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचबरोबर- सियाराम मिल्क एजन्सी चे प्रोप्रा संतोष मेघराज धर्मावत यांच्या दुकानाला भेट दिली. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी- मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यात्रेमध्ये जागोजागी फिरून सर्वांचे गाठीभेटी घेतल्या.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आढळराव पाटील यांनी अभिवादन केले.
यावेळी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एक लाखांचं वोटिंग भोसरी मतदारसंघातून देऊ असे आश्वासन मतदारांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आले.
याप्रसंगी आमदार महेश दादा लांडगे, माजी नगरसेविका कविताताई आल्हाट, राष्ट्रवादी शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड अजित भाऊ गव्हाणे, पुणे नियोजन समिती सदस्य विजय फुगे, अपूर्व आढळराव पाटील, वैष्णवी विचार समिती अध्यक्ष राजाराम महाराज घुगे, विशाल महाराज घुगे शांताराम घुगे, सुभाषराव माने पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.