शबनम न्युज | पनवेल
शेतकरी कामगार पक्षाचे आदर्श नेते स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३६ व्या पुण्यतिथी निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी विनम्र अभिवादन केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या मूल्य आणि विचारधारेशी अखेरच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहिलेले सच्चे जननायक अशी ओळख जनार्दन भगत साहेब यांची होती. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आवर्जून उपस्थित राहत संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
संजोग वाघेरे पाटील यांच्या समवेत यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप नेते तथा सुप्रसिद्ध उद्योगपती जे. एम. म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष सदस्य आर. सी. घरत, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत आदी उपस्थित होते.