शबनम न्युज | भोसरी
शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार आघाडीवर आहे. या मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दौरा सुरू आहे. या भोसरी दौऱ्या दरम्यान लांडेवाडी रोड येथे माजी आमदार विलासशेठ लांडे पाटील यांच्या निवासस्थानी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. लांडे परिवार कडून आढळराव पाटील यांचे आत्मीय स्वागत करून आदर सत्कार करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गव्हाणे, पुणे नियोजन समिती विष्णू फुगे, नगरसेवक भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक विक्रम लांडे, समन्वयक महायुती भोसरी दत्तात्रय भालेराव, माजी स्वीकृत नगरसेवक नंदकुमार शिंदे, युवा नेते विशाल लांडगे, खंडोबा मित्र मंडळ अध्यक्ष भोसरी अविनाश शिंदे, अपूर्व आढळराव पाटील, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे, समन्वयक महायुती दत्तात्रय भालेराव, शिवसेना समन्वयक विशाल लांडगे, शिवसेना समन्वयक आबा लांडगे, आरपीआय मातंग आघाडी अध्यक्ष स्वप्निल कांबळे, उपाध्यक्ष रमेश गजरमल कोषाध्यक्ष रमेश शिंगारे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष लीलाताई ठोसर, सरचिटणीस सचिन डेढे, शहराध्यक्ष अश्विन खुडे, प्रवक्ते भारत बनसोडे, कार्याध्यक्ष लिमराज कांबळे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.