शबनम न्यूज , प्रतिनिधी ;
शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसेना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार असलम इसाक बागवान यांना ओबीसी बहुजन पार्टी पक्षाच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील अशी थेट लढत होत आहे. लोकसेना पक्षाच्या वतीने असलम बागवान हे सुशिक्षित उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा संविधानाचे अभ्यासाक म्हणून प्रसिद्ध असलेले असलम इसाक बागवान यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल केल्यानंतर ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत जे सोडविणे आवश्यक आहेत तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोंडवा हडपसर, जुन्नर या मतदारसंघात आपले वर्चस्व असल्याचे अस्लम बागवान यांनी सांगितले आहे, त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी सोपी असल्याचाही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी बहुजन पार्टी वतीने महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे.