पिंपरी, दिनांक २९ मे २०२१ :- नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांच्या पुढाकाराने दापोडी येथील आनंदवन कुष्ठबाधित वसाहतीमध्ये आज कुष्ठ बाधितांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त गणेश ढाकणे यांनी प्रतिक्रिया दिल्या नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करून केलेले सहकार्य आणि एकजुटीने केलेल्या मुकाबल्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणू शकलो असे मत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला pqrtvunपरतवून लावण्यासाठी असेच सहकार्य सर्वांनी कायम ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, नगरसदस्य राजू बनसोडे, स्वीकृत सदस्य अनिकेत काटे, माजी नगरसदस्य राजेंद्र काटे, युवानेते शेखर काटे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग नागरी पर्यवेक्षकीय पथकाचे वैद्यकीय सहाय्यक नागेश कोष्टी, अवैद्यकीय सहाय्यक श्रीलेखा बिजरे, आनंदवनचे सरपंच नवनाथ मगर, सामाजिक कार्यकर्ते सुरेखा दोडमणी, निलेश दोडमणी, विक्रम मानेकर, अनिल कांबळे, सचिन कोष्टी, लक्ष्मी कापसे आदी उपस्थित होते.