शबनम न्युज | पुणे
गर्भपणाच्या तिसऱ्या महिन्यापासून प्रसूती व मुलाचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण होईपर्यंत सहा हजारांचा लाभ देणाऱ्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेने कोट्यवधी रुपयांचा टप्पा पार केला आहे. सन 2018 पासून मार्च 2023 पर्यंत पुणे शहरात 75 हजार 642 जणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
केंद्र पुरस्कृत ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू केली आहे. गर्भपणात चांगला पोषण आहार मिळावा व जन्माला येणाऱ्या बालकाचे आरोग्य सुदृढ असावे, यासाठी ही योजना सुरू केली गेली. ही योजना महिला आणि बालविकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबविली जाते.
कधी मिळतो?
1. पहिला एक हजार रुपयांचा हप्ता अंगणवाडी केंद्रात किंवा दवाखान्यात गर्भधारणेची नोंदणी केल्यास.
2. गर्भधारणा चे सहा महिन्यानंतर दोन हजारांचा दुसरा हप्ता.
3. तिसरा दोन हजार रुपयांचा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो.
योजनेच्या अटी…
1. एकदाच योजनेचा लाभ मिळू शकतो.
2. गर्भवती आणि स्तनदा महिला पात्र.
3. लाभार्थींचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक केलेले असावे.
4. लाभार्थी आणि त्यांच्या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य.
5. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केलेला असावा