शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. दिवाळी सुरु होते ती “वसु – बारस” या दिवसापासून. आज सोमवारी (दि. ०१) रोजी “वसु – बारस” आहे. गाई-गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. तिचा सन्मान व्हावा म्हणून या दिवशी गाईची पाडसासह सायंकाळी पूजा करण्याची प्रथा आहे.
वसुबारस निमित्त चिखली – कुदळवाडी परिसरातील महिला भगिनींना गोमातेचे पुजन करता यावे याकरिता ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत दिनेश यादव यांनी पुढाकार घेऊन गो माता पुजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कुदळवाडीतील रामदासनगर येथील चंद्रभागा गोशाळा, पै निलेश यादव फार्म, प्रथमेश पार्क शेजारी कुदळवाडी, गणेश किसन यादव, फार्म इंद्रायणी वजन काट्यामागे, कुदळवाडी या तीन ठिकाणी आज सोमवारी सायंकाळ नंतर ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना गाईचे पूजन करता येणार आहे, या संधीचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यादव यांनी केले आहे.