शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ क्षेत्रीय समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून सोमवारी (दि. २५) अखेरपर्यंत नऊ अर्ज दाखल झाले आहेत. विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसने एकही अर्ज सादर केलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकाच जागेवर भाजपच्या दोन उमेदवारांनी अर्ज सादर केल्यामुळे त्या एका जागेचा तिढा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी विद्यमान अध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
अध्यक्ष पदासाठी निवडणूक ही शुक्रवारी (दि. २९) होणार आहे. निवडणूक प्रकिया पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र विनवडे यांच्या अध्यक्षतेखाली पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात सकाळी अकरापासून सुरू होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची नावे….
‘अ’ क्षेत्रीय समिती – भाजप नगरसेवक शैलेश मोरे
‘ब’ क्षेत्रीय समिती – भाजप नगरसेवक सुरेश भोईर
‘क’ क्षेत्रीय समिती – भाजप नगरसेवक राजेंद्र लांडगे
‘ड’ क्षेत्रीय समिती – भाजप नगरसेवक सागर आंघोळकर
‘ई’ क्षेत्रीय समिती – भाजप नगरसेवक विकास डोळस
‘फ’ क्षेत्रीय समिती – भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड व नगरसेविका अश्विनी भीमा बोबडे
‘ग’ क्षेत्रीय समिती – भाजप नगरसेवक अभिषेक बारणे
‘ह’ क्षेत्रीय समिती – अंबरनाथ कांबळे.