शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवार (दि. १८ नोव्हेंबर २०२१) रोजी पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता तथा विभाग प्रमुख, पाणीपुरवठा प्रमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जल उपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्र. २३ जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणी पुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असल्यामुळे गुरुवार (दि.१८ नोव्हेंबर २०२१) रोजी शहरातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ रोजी मनपा मार्फत होणार सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशीच म्हणजे शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी मनपा कडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.