‘ सुहृद खुला मंच ‘, पुस्तक कट्टयाचे उद्घाटन
अभिनेते मोहन जोशी, डॉ. माधवी वैद्य, शर्वरी जमेनीस यांची उपस्थिती
शबनम न्यूज :- पुणे (दि.२९ नोव्हेंबर) :- गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ आयोजित ‘गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ‘ अंतर्गत रविवारी ‘सुह्रद’ या गृहप्रकल्पाच्या ‘ सुहृद खुला मंच ( अॅम्फी थिएटर ) आणि पुस्तक कटट्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, डॉ. माधवी वैद्य, शर्वरी जमेनीस यांच्या उपस्थितीत झाले.
‘घर संकल्पनेला अनुसरून ‘ रंगसंध्या ‘ हा काव्य ,संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
सुह्रद सोसायटी, मनोहर मंगल कार्यालयासमोर, नळस्टॉप ( कर्वेनगर ) येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
इमारतींची टेरेस धूळ खात पडून न राहता तेथे सांस्कृतिक कट्टे, वाय फाय झोन, टेरेस गार्डन अशा सुविधा निर्माण कराव्यात ,अशी गंगोत्री होम्सची संकल्पना आहे. ‘ सुह्रद खुला मंच ‘ याच संकल्पनेतून तयार करण्यात आला आहे.
घर आणि नात्यांवर आधारित डॉ. माधवी वैद्य निर्मित ‘रंग संध्या’ हा काव्य -स्वर असा सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी सादर करण्यात आला. घर ‘ विषयक कविता, गीते, गाणी सादर करण्यात आलं.शर्वरी जमेनीस, धीरेश जोशी त्यात सहभागी झाले.
खेडयामधले घर कौलारू, या सुखांनो या,तुझ्या वंदितो पाऊलास ‘ यासारख्या गीतांनी
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
गंगोत्री ‘ तर्फे राजेंद्र आवटे, गणेश जाधव, मकरंद केळकर यांनी स्वागत केले.
गृहबांधणी विषयक प्रदर्शन सकाळी 10 पासून सायंकाळी ९ पर्यंत मनोहर मंगल कार्यालय येथे सुरू होते. पुणेकरांनी तेथेही उपस्थित राहून पुनर्विकास विषयक माहिती घेतली.
वाढत्या पुण्याच्या नगर नियोजनात महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रिडेव्हलपमेंट ( पुनर्विकास ) विषयावर सर्वंकष विचार मंथन करण्याकरिता ‘गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज ‘ यांच्यातर्फे २६ ते २८ नोव्हेंबर रोजी ‘गंगोत्री रिडेव्हलपमेंट फेस्टिवल ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. गृह बांधणी विषयक प्रदर्शन, परिसंवाद, घर संकल्पनेला धरून काव्य आणि संगीत कार्यक्रम असे या फेस्टिवलचे स्वरूप आहे . त्या अंतर्गत हे कार्यक्रम पार पडले, त्या सर्व कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.