शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० जानेवारी) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1936साली स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणारी अखिल भारतीय संस्था राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा यांच्या वतीने सन 2019 सत्रामध्ये राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
या परीक्षेमध्ये कु. गौतमी संजय निकम ही विद्यार्थिनी भारतामध्ये सर्वप्रथम आली आहे. त्यामुळे कु.गौतमी निकम हिचा नाना काटे सोशल फाऊंडेशन आणि सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिला पुढील शिक्षणासाठी नाना काटे सोशल फाऊंडेशन व स्विकृत सदस्य श्री .सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
Advertisement