शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२२ करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयारीला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने आपल्या इच्छुक उमेदवारांकडून छापील अर्ज तसेच उमेदवारांचे कार्य अहवाल देखील मागविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने ४६ प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी सोमवार दिनांक ०७ मार्च २०२२ ते शनिवार दिनांक १२ मार्च २०२२ पर्यंत सकाळी १०:०० ते सांयकाळी ०४:०० या वेळेत राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथून छापील अर्ज घेवून संपूर्ण अर्ज भरून पक्ष कार्यालयात जमा करावेत. तसेच अर्जासोबत उमेदवारांना कार्य अहवाल जोडने आवश्यक आहे. असे आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी इच्छुक उमेदवारांना केले आहे.
Advertisement