महिलांची बाईक रॅली, सुलभाताई उबाळे यांचा उपक्रम
अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांच्या शुभहस्ते होणार जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभाताई उबाळे यांच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच या जागतिक महिला दिनानिमित्त सुलभाताई उबाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेच्य स्टार प्रचारक सिने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांच्या शुभहस्ते होणार आहे, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित बाईक रॅलीत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुलभाताई उबाळे यांनी केले आहे.
या निमित्ताने आयोजित बाईक रॅली मंगळवार आठ मार्च रोजी दुपारी चार वाजता शिवसेना युवा सेना जनसंपर्क कार्यालय तुळजा भवानी चौक ,टावर लाइन रोड, तुळजाभवानी मंदिरा जवळ, मिरगणे कॉम्प्लेक्स, त्रिवेणी नगर , पुणे या ठिकाणाहून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.जागतिक महिला दिनानिमित्त महिला कोणत्या हि क्षेत्रात मागे नाही हा संदेश देण्यासाठी आपण ही बाईक रॅली आयोजित केली असल्याची प्रतिक्रिया सुलभाताई उबाळे यांनी दिली,महिला सक्षमच असल्याचे प्रदर्शन या बाईक रॅलीच्या निमित्ताने होणार आहे.