शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ मार्च) :- नागरिकांचे थकीत वीज बिल, वीज पुरवठा खंडित न करता सवलत मिळावी व परिसरातील धोकादायक विद्युत वाहिन्या व पोल दुरुस्ती करा, अशी मागणी विशाल काळभोर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, प्रभारी पुणे शहर ज़िल्हा यांनी एम.एस.बी. ऑफीस येथे कवडे साहेब व भोसले साहेब यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अंजठा नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, विद्या नगर, शंकर नगर, राम नगर, दत्त नगर, काळभोर नगर परिसरातील घरगुती विद्युत मिटर थकित बीलामुळे (विद्य़ुत मिटर) वीज जोड खंडीत करण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षा पासून कोरोना काळामध्ये उ़द्योग व व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणी येत आहेत, ज्यामुळे नागरिकांची गेल्या वर्ष भरात थकीत बीले झाली आहेत. तरी आपण वीज पुरवठा खंडित न करता बीलामध्ये सवलत देऊन टप्या टप्याने वीज बील आकारावे ही विनंती. तसेच राम नगर येथील रहिवासी परिसरात विद्युत पोल जुने होऊन गंजुन मोडकळीस आले आहेत तसेच विद्युत वाहिन्यांचे एका पोल वर अनेक जोड दिल्यामुळे त्या वायर खाली लोंबकळत आहेत, त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो त्यावर तात्काळ आपण संबधित परीसरसमध्ये भेट देऊन उपाय व योजना करावी, असे ही सदर निवेदनात त्यांनी म्हंटले आहे. तसेच त्यांच्यासमवेत यावेळी अतुल चव्हाण, निखिल पवार, विकास ठानांबीर उपस्थित होते.