शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ मार्च) :- काळभोर नगर लगत सह्याद्री कंपनी ( स्वस्तिक ) मधुन होणाऱ्या दुषित वायु प्रदुषणामुळे परिसरातील नागरिकांना कुजट वासाने व श्वसनाच्या होणाऱ्या त्रासाबाबत विशाल काळभोर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, प्रभारी पुणे शहर ज़िल्हा यांनी दि ०९ रोजी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना माहिती देऊन निवेदन दिले.
यावेळी सतीश बाराहाते उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिं.चिं शहर व सचिन मोकशी संघटक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी विधानसभा हे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, सह्याद्री कंपनी ( स्वस्तिक ) मधुन ठरावीक वेळेनुसार होणाऱ्या दुषित वायु प्रदुषणामुळे परिसरातील काळभोर नगर येथिल सुर्योदय कॉम्प्लेक्स तसेच विष्णु विहार, ऐश्वर्यम सोसायटी, मोहन नगर व लगतच्या शाळा या परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने कुजट वास येणे, खोकला, सर्दी व श्वसनाचे त्रास होणे विशेत: परीसरातील लहान मुले व जेष्ठ नागरिक यांना होणाऱ्या त्रासामुळे संबधित कंपनी मध्ये भेटून चौकशी व तपासणी करुन योग्य ती उचित कारवाई करावी असे ही सदर निवेदनात त्यांनी म्हंटले आहे.