पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील मोरेवस्ती भागातील किशोरवयीन शंभूप्रेमी मुला मुलींनी अनवाणी पायाने दुर्गवारी केली पांडा भाऊ साने युवा मंच व नारीशक्ती महिला मंच यांच्या सहकार्याने तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोरे वस्ती येथील मुला-मुलींनी कराटे प्रशिक्षण देणाऱ्या U.S.K.A पिंपरी-चिंचवड शहरातील कराटे या ग्रुपने पाच गड किल्ले सर केले आहेत. छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त 9 ते 17 वयोगटातील मुला मुलींनी कोरीगड, तिकोना ,विसापूर, लोहगड, राजगड असा हा पाच किल्ल्यांचा प्रवास अनवाणी पायांनी पूर्ण केला, शिवाय मुलींनी नऊवारी परिधान करून आपला संपूर्ण प्रवास न थकता पार पाडलाय.
छत्रपती संभाजी राजे यांची जयंती अनेक मंडळ डीजे वाजवून तसेच अनेक प्रकारे वायफळ खर्च करून साजरा करत असतात परंतु समाजाला छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास समजावा या हेतूने या किशोरवयीन मुलामुलींनी गड-किल्ल्यांचा प्रवास करून अनोखा उपक्रम राबवून समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या गड प्रवास अभियानात दीप्ती संतोषी हरगुडे, पृथ्वीराज सुनिता फडाले ,गणेश मनीषा पाटील , नेत्रा शैला थिटे , भक्ती नर्मदा घुले, श्रावणी संतोषी हलकुडे , सानिका सुरेखा यादव , कल्पेश मंगला वाडोकार., गुणवंत मंदा भंगाळे, यांनी हा अनवाणी प्रवास केला असून या प्रवासात सौ.आरती मल्ला यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रशिक्षक प्रफुल्ल शोभा श्रेष्टा यांचे मोलाचे सहकार्य या मुलामुलींना लाभले अशा अनोख्या पद्धतीने छत्रपती संभाजी राजेंना या मुला मुलींनी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना दिली.महिन्यातून एकदा तरी मुलांसहीत गडकिल्ले सर करावेत व गडकिल्लांवर कचरा पसरवू नये याची दक्षता घ्यावी. असाच हा या मुलांचा अजून एक असा प्रेरणादायी संदेश आहे.