शबनम न्युज | चिंचवड
गुरू पौर्णिमा निमित्त स्वरतरंग संगीत शाखेच्या वतीने तानाजी नगर चिंचवड येथे शिष्यांकडून गुरुंसाठी व परिसरातील नागरिकांसाठी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
परिसरातील मुला-मुलींना संगीताची आवड राहावी व पुढे चिंचवड परिसरातून मोठे कलाकार घडावे या हेतून या शाखेचे प्रमुख मा.विश्वनाथ रामचंद्र सतत प्रयत्न करीत असतात.
या कलाकारांना आपली कला सादर करता यावी व नागरिकांना याचा आनंद मिळावा व गुरुपौर्णिमा साजरी व्हावी अश्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य:मा. मधुकर बच्चे आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीती मध्ये डॉ. अशोक कुमार सोनानी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात परिसरातील मुला-मुलींनी तबला वादन,बासरी, हार्मोनियम, व विविध भजन आदी कला सादर केल्या.
या मंत्र मुग्ध कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
परिसरातील मुला-मुलींना संगीताची आवड लागण्यासाठी व यातून मोठे कलाकार होण्यासाठी जेव्हा जेव्हा मदत लागेल माझ्याकडून श्यक्य ते प्रयत्न केले जातील असे आश्वासन महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य:मधुकर बच्चे यांनी उपस्थित कलाकार व नागरिकांना दिले.
शाखेचे प्रमुख विश्वनाथ रामचंद्र यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्थाविक केले. सुकेश देशपांडे,मिलिंद कुलकर्णी,स्वरूप पेंढुरकर,अतुल जोशी,आदित्य सुतार,आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.