शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
दिवंगत नगरसेवक कै.जावेद शेख यांच्या द्वितीय पुण्यस्मरन दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर, मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर, मोफत सर्वांसाठी रक्त तपासणी, (आवश्यक असणाऱ्या सर्व रक्त चाचणी ) महिलांसाठी मोफत थाइरॉइड चाचणी, आकुर्डी परिसरात वृक्षारोपण,कार्यक्रम स्थळी वृक्ष वाटप अशा समाज उपयोग कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष – निखिल उमाकांत दळवी यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्धघाटन सामाजिक कार्यकर्त्या फहमिदा जावेद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला आकुर्डी परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. आकुर्डी मधील वसंत दादा पाटील मनपा शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम स्थळी नागरिकांना मोफत वृक्ष वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिराला ८१ रक्तदात्यानी रक्तदान केले. आरोग्य शिबिरा मध्ये ही नागरिकांनी मोठा सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला आमदार आण्णा बनसोडे, मा.विरोधीपक्ष नेते राजु मिसाळ, कॉंग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, मनसे शहरप्रमुख सचिन चिखले, कॉंग्रेस नेते सचिन साठे, टाटा मोटर्स युनियन कार्याध्यक्ष अशोक माने, मा.मोरेश्वर भोंडवे, मा.नगरसेवक धनंजय काळभोर ,मा.नगरसेविका वैशाली काळभोर, मा.नगरसेवक प्रसाद शेट्टी, मा.नगरसेविका उर्मिला काळभोर, मा.शेखर ओव्हाळ, युवा नेते रवि गोडेकर, अजय लड्डा, विश्वनाथ जगताप, अरविंद कांबळे, जेष्ठ नागरिक अण्णा कुरहड़े, जाधव सर, संपतराव शिंदे, शेखर जाधव, केदार वायाल, कामगार नेते किरण देशमुख, संजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाचपुते, महिला कार्यकर्त्या वैशाली गायकवाड़, निर्मला माने, गायत्री शर्मा ,मोनिका गाढ़वे, महक इनामदार, युवा सेने चे माऊली जगताप, रोहिदास शिवनेकर, दीपक वाघ, तुकाराम जाधव, अशोक मगर, विजय शेळके, राष्ट्रवादी युवक चे मंगेश बजबळकर, पंकज बागड़े, महेश पानसकर ,दिलीप सय्यद ,योगेश मोरे, शादाब खान, दिनेश पटेल, वृषभ काटे, सौरभ जगताप, अमोल पुन्नासे, विराज कुटे आदी मान्यवर उपस्तिथ होते.
या कार्यक्रमाचे आयोजन विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष – निखिल उमाकांत दळवी यांनी केले होते. कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांनी व मान्यवरानी दिवंगत नगरसेवक कै. जावेद शेख यांना आदरांजली वाहिली तसेच कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.