शबनम न्युज | दिघी
दिघी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दिघी येथे भारताच्या ७५ व्या स्वतंत्रताच्या अमृत महोत्सव निमित्ताने “जागर राष्ट्रभक्तीच्या जाणीवांचा सन्मान माजी सैनिकांचा” हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगरसेवक चंद्रकांतजी वाळके यांचा सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी १५० माजी सैनकांचा सन्मान करण्यात आला व त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भेटवस्तू म्हणून छत्री देण्यात आली.
या सन्मान सोहळ्यास पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर साहेब, महिला अध्यक्ष कविताताई आल्हाट, कॅप्टन चव्हाण साहेब, कॅप्टन भुसे सर, व मोठ्या प्रमाणात माजी सैनिक अधिकारी,तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, निलेश भाऊ निकाळजे, युवा नेते राहुल पवार, राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष सौ एडवोकेट सोनाली गाडगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश डोळस, लवकुश यादव, तुषार ताम्हणे, रोहित वाबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस दीपक गुप्ता, नितीन सूर्यवंशी, अनुज देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सचिव ओम शिरसागर, निखिल गाडगे,कुणाल जगताप रुबान शेख, अनिल चव्हाण, सुरज बोराटे, नैनिल रुणवाल, व मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.