शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सौ. श्रद्धाताई सपकाळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मा. प्रशांत सपकाळ यांच्या वतीने पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या सांगवी पोलिस ठाण्यामध्ये ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेत जनतेसाठी अविरतपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना राखी बांधून चैतन्यपूर्ण वातावरणात रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत लहान मुलांनी आपल्या कौशल्यातून बनवलेल्या राख्या पोलिसांना बांधण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी लहान मुलांनी आपल्या कल्पकतेने तिरंगी रंग छटांनी बनवलेल्या आकर्षक राख्यांबद्दल मुलांचे कौतुक केले.
या उपक्रमाच्या प्रसंगी सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. सुनील टोणपे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुनील तांबे, सहा. पोलिस निरीक्षक श्री. दिलीप जाधव, पोलिस कर्मचारी श्री. नितीन काळे, श्री. विशाल शिंदे, श्री. संजय दामसे, श्री. विश्वनाथ असवले, श्री. संजय सुपे, श्रीम. नीलम गायकवाड, श्री. महेश कारगड उपस्थित होते.
सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सावंत काकू, पुष्पा काळे, प्रा. सोनल कदम, स्वाती हिप्परगी, शिल्पा महाजन, नंदा नागवडे, अनुष्का कदम, आरती सपकाळ, श्वेता महाजन यांनी परिश्रम घेतले.