शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
ख्यातनाम पार्श्वगायिका राधा ह्दयनाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीबद्दल पिंपरी-चिंचवड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या ६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पुण्यातील एनडीए रोडवरील झपूर्झा या म्युझियम ऑफ आर्ट अँड कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम होत असून फाऊंडेशनचे अध्यक्ष व लायन्स क्लब ऑफ पुणे चतु:श्रुंगीचे प्रेसिडेंट विजय भिसे ही मुलाखत घेणार आहेत. पार्श्वगायन क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळविलेल्या मंगेशकर घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व राधा मंगेशकर या करीत असून आपल्या आयुष्यातील व कुटुंबातील कडू-गोड आठवणी आणि प्रसंग मुलाखतीच्या माध्यमातून त्या उलगडून सांगणार आहेत.
यावेळी धनंजय भिसे व अनिता भिसे लिखित “लंडन-स्विस- पॅरिस एक अविस्मरणीय अनुभव” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी आमदार विलास लांडे ,माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नाना काटे, निर्मला कुटे,सुजाता पालांडे, शंकर जगताप ,ज्ञानेश्वर उर्फ माऊली लांडे पाटील, चंदाताई भिसे व कुंदाताई भिसे उपस्थित राहणार आहेत.