शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
नवरात्र उत्सवानिमित्त नारीशक्ती महिला मंच व मनोज भाऊ जारे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने साने चौक चिखली परिसरातील महिलांसाठी मोफत महिला आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला भगिनींच्या आत्मसामानासाठी या आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे नीलिमाताई मनोज जरे यांनी सांगितले.
या आत्मरक्षा प्रशिक्षण शिबिरात कौल तोडण्याचा रेकॉर्ड शिबिरातील सर्व महिला मिळून करणार आहेत या रेकॉर्डमध्ये जवळपास १०० ते १५० महिला सहभागी होणार आहेत. बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल कामाने वस्ती, चिखली, पुणे येथे शनिवारी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची माहिती सौ नीलिमाताई मनोज जरे यांनी दिली आहे.
महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे, महिला या आधुनिक युगात सक्षम व्हाव्या, तसेच प्रत्येक प्रसंगाला सामोरे जावे, यासाठी महिलांनी आत्मरक्षणाचे धडे घ्यायला हवे, तसेच स्वतःचे एक वेगळे स्थान महिलांनी समाजात निर्माण करायला हवे, महिलांचं आत्मविश्वास वाढावा, याकरिता सदर आत्मरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होत आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने करण्यात आली. तसेच या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा व कौल तोडण्याचा रेकॉर्ड या रेकॉर्ड चे आपणही साक्षीदार व्हा, असे आवाहन नीलिमाताई मनोज जरे यांनी केले आहे.