शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्क योजना राबविण्यात येत आहे या योजनेला सर्वच स्तरातून विरोध करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख अजित संचेती यांनीही विरोध दर्शविला आहे तसेच पे ऍण्ड पार्क योजना रद्द करावी अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
हि बातमी पण वाचा – शहरातील दानशूर व्यक्तींनी पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत करावी – कविता संदेश आल्हाट
अजित संचेती यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पिंपरी चिंचवड शहरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्योगव्यवसाय,व्यापारी वर्ग,रिक्षाचालकयांच्यावर अत्यंत गंभीर परिणाम झाले असून या शहरातील सामान्य कर दात्या नागरिकाच्या हाताला काम नाही.रोजगार नाही, लॉकडाऊनचे गंभीर परिणाम सर्व सामन्य पिंपरी चिंचवडकरांचे बजेट पूर्णपणे ढासळले आहे.कोरोना त्याचबरोबर वेगवेगळे साथीचे आजार यामुळे दवाखाण्याचा खर्च वाढला आहे,शिक्षणाचा संदर्भात देखील सर्वसामान्य नागरिकांना खर्च परवडणारा नाही अशा परिस्थितीत सत्ताधरी पक्ष व नगरसेवक यांनी सर्वसामान्य नागरिकांनाचा विचार न करता व विश्वासात न घेता 1 जुलै पासून पे अँड पार्किंगची योजना
अंमलात आणून सर्व सामान्य नागरिकांना कडून जबरदस्ती वसुली महापालिका व सत्तेतील नगरसेवक यांच्याकडून केली जात आहे याबाबत आमच्या भारतीय राष्ट्रवादी पार्टी कडून तीव्र निषेध नोंदवत आहोत.
पे अँड पार्किंग च्या नावाखाली जबरदस्ती सर्व सामान्य पिंपरी चिंचवड कराचे खिसे कापून
जर पैसे वसुली करत असाल तर लवकर थांबवावी अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी व
कार्यकर्ते जेथे जेथे पे अँड पार्किंग ची वसुली होत असेल ते बंद पडू हे जर झाले तर याला पालिका व आयुक्त जवाबदार असतील यासाठी लवकरात लवकर ही योजना बंद करावी