शबनम न्युज | पिंपरी
ॲड.विशालभाऊ जाधव यांचा वाढदिवस आज विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी राबवून उत्साहात साजरा झाला. सकाळी येथे अनाथ आश्रम येथील लहान मुलांना आज खाऊवाटप करण्यात आले. दुपारी गोशाळेमध्ये चारावाटप तसेच दि. ०४. १२. २०२२ रोजी सिल्व्हर ओक सोसायटी मोशी व दि ०५. १२. २०२२ रोजी सायं ७ ते १० या वेळेत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा खास महिला भगिनींसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
विजेत्यांसाठी २ एलईडी टीव्ही , २ फ्रिज , २ वॉशिंग मशीन , २ पिठाच्या गिरणी , २ मोबाईल फोन ,तसेच लकी ड्रॉ विजेत्या भगिनींसाठी ६ पैठणी ,६ सोन्याची नथ , ६ मिक्सर , ६ गॅस शेगडी , ६ टेबल फॅन अशी भव्य पारितोषिके ठेवण्यात आली होती.
त्यानंतर केक कापून अभिष्टचिंतन सोहळा पार पडला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष इम्रानभाई शेख ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता ताई आल्हाट ,राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकजभाऊ भालेकर नगरसेवक वसंतशेठ बोराटे ,सामाजिक कार्यकर्ते उत्तम आल्हाट , मा.नगरसेविका मंदाताई आल्हाट ,कामगार नेते युवराज पवार ,उद्योजक संतोषशेठ बारणे , उद्योजक गणेश जाधव यांची या वाढदिवसांच्या कार्यक्रमांना विशेष आवर्जुन उपस्थिती होती.