शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील कु. संस्कृती मातोबा कुंजिर हिने कॉलमपूर मलेशिया येथे 15 ते 17 डिसेंबर 2022 दरम्यान, विश्व थ्रोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय थ्रो बॉल संघात महिलांसाठी उपविजेते पद ट्रॉफीसह पदक मिळविले. तसेच या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने तृतीय क्रमांकाचे कांस्यपदक पटकाविले आहे.
संस्कृती कुंजीर हिने या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय व अभिमानास्पद कामगिरी केली. त्याचप्रमाणे भारतीय पुरुष आणि महिला दोन्ही संघाच्या प्रशिक्षक सौ. संपदा म्हातोबा कुंजीर यांना विश्व थ्रोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून यावेळी सुवर्णपदक म्हणून गौरविण्यात आले.
त्यांच्या या कामगिरीमुळे देशाचे नाव जागतिक पातळीवर तसेच पिंपरी चिंचवड शहरातील त्या राहत असलेल्या प्रभागाचे नावास नावलौकिक मिळविल्याबद्दल स्व.गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट वतीने त्यांचा सत्कार, सन्मान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वर गायकवाड, बबन सातपुते, अर्जुन पेटकर, राजेश धवन, रायकर काका, सदाशिव कुंजीर, मल्लकार्जुन बुक्की , तात्या शिंगारे तसेच सीए तांबोळी यांच्यासह रहाटणीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित आमचे ट्रस्टच्या वतीने देविदास तांबे यांनी आभार व्यक्त केले. तसेच संस्कृती कुंजीर व सौ. संपदा कुंजीर यांचे अभिनंदन केले.