शबनम न्युज | पुणे
पुण्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. कुंजीरवाडी येथील पेट्रोल पंपावर हल्ला करून लुटण्याचा आरोपींचा कट असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या चार आरोपींना अटक केली. प्रेम लोंढे (वय.19, रा. आळंदी रोड), रुषिकेश लोंढे (वय.26, रा. पानमळा), गणेश खलसे (वय.22) आणि तानाजी गावडे (वय.23, रा. कुंजीरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबाची आळंदी रेल्वे पुलावर धारदार शस्त्रे घेऊन काही लोक उपद्रव करत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला.लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई सुरू केली असता, पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी घटनास्थळी धाव घेत चार आरोपींना ताब्यात घेतले, तरीही त्यांचे काही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.पोलिसांनी सांगितले की त्यांनी आरोपींकडून धारदार शस्त्रे, एक नायलॉन दोरी, मिरची पावडर आणि इतर साहित्य जप्त केले. अधिक तपास काळभोर पोलिस करीत आहेत.