शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
अमेरिकेतील नेवार्कहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक मोठा गोंधळ झाला. प्रवासादरम्यान एका प्रवाशाने पॅनिक अटॅक आल्यानंतर गोंधळ घातला. यादरम्यान त्याने आपल्या पत्नीचा गळा देखील दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र क्रू मेंबर्सनी त्यांना वाचविले. त्यानंतर विमान वेळेवर मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरविण्यात आले.
बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणारे मुंबईतील एका व्यावसायिकाने नेवार्कहून विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच गोंधळ सुरू केला. यादरम्यान प्रवासाने आरडाओरडा करत फ्लाईट टेकऑफ करण्याची मागणी देखील केली. जेव्हा क्रू मेंबर्स आणि त्यांच्या पत्नीने त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीचा गळा देखील आवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने प्रवाशावर जबरदस्ती केली आणि त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. यानंतर विमान वेळेवर मुंबई विमानतळावर उतरविले.