शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी ते दापोडी या मार्गावर नव्याने स्वतंत्रपणे जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या ठिकाणी जलवाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका स्वाती माई काटे यांनी वारंवार निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, या जलवाहिनीद्वारे शहराचे सेक्टरच्या भाग असलेले दापोडी व सांगवी परिसराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जाणार आहे. या मार्गावर निर्माण होणाऱ्या इमारतीला पाणी दिला जाणार आहे. त्यासाठी 70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
ही जलवाहिनी निगडीच्या भक्ती शक्ती समूह शिल्पाच्या बाजूने सर्विस रस्त्याने दापोडी पर्यंत नेण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या स्वतंत्र जलवाहिनीमुळे शहराचा सेक्टरच्या भागातील दापोडी व सांगवी परिसरात पुरेशा परमाणावर पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.
शहराची गरज ओळखून निगडी ते दापोडी अशी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, या जलवाहिनी द्वारे दापोडी व सांगवी परिसराला पाणी देण्याचा हेतू आहे, या कामाच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. या कामासाठी सुमारे 70 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्थापन प्रकल्प विभागाकडून निगडीत दापोडी महामार्गावर पदपथ व सायकल ट्रॅक बसविण्यात येणार आहे, ते काम सुरू होण्यापूर्वीचे काम पूर्ण करून घेण्यात येणार आहे असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.