पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात खेळाच्या मैदानाची गरज असताना केवळ महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण गेल्या आठ वर्षापासून विकसित होऊ शकलेले नाही परिणामी ही जागा वाहनांचे पार्किंग बनले आहे त्यामुळे महापालिकेने त्वरित ही आरक्षित जागा विकसित करून पिंपळे गुरवकरांना खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पिंपळे गुरव मधील आरक्षण क्रमांक ३४४, 344 अ, 347 ही जलतरण तलावाशेजारी जागा महापालिकेने खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केली आहे सदर खेळाच्या मैदानाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे, तत्कालीन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांच्या कार्यकाळात अर्थसंकल्पात साडेतीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती तसेच 2015 मध्ये या आरक्षित जागेला सीमा भिंत बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली होती या आरक्षणाच्या जागेत खेळाच्या मैदानासोबत रस्त्याच्या बाजूला व्यापारी गाळ्यांचे नियोजन असल्याने महापालिकेला आर्थिक उत्पन्नही सुरू होणार आहे मात्र महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे खेळाच्या मैदानाचे आरक्षण विकसित होण्यापासून रखडले असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सांगितले आहे