शबनम न्युज | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित होत आहे या कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात येणार असून सदर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे दुपारी एक वाजता संपन्न होत आहे.
अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट निर्माण झालेले आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा एक गट तर अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा दुसरा गट असे राष्ट्रवादीचे दोन गट असताना तसेच पिंपरी चिंचवड शहरावर प्रथमपासूनच अजित पवार यांचे वर्चस्व राहिल्याने उद्या होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.