शबनम न्युज | पुणे
चोंधे पाटील बॅडमिंटन हॉल विशालनगर पिंपळे निलख येथे काल झालेल्या पहिल्या कै. सुरेश चोंधे-पाटील स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धेत 10 वर्षाखालील गटात दहा रेटेड खेळाडूंसह 87 खेळाडूंनी, 14 वर्षाखालील गटात दहा रेटेड खेळाडूंसह 83 खेळाडूंनी आणि खुल्या गटात वीस बावीस रेटेड खेळाडूंसह 107 खेळाडूंनी अशा एकूण 277 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी मा.नगरसेविका आरतीताई चोंधे व शहराध्यक्ष भाजयुमो पिंपरी चिंचवड शहर मा. श्री.संकेत चोंधे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नागरिकखेळाडू श्री.रवींद्र वकील स्पर्धेचे प्रमुख पंच चिन्मय नाईक यांचीही उपस्थिती होती.
10 वर्षाखालील गटात ईशान अर्जुन ने सातव्या फेरीत सर्वज्ञ बालगुडे याचा पराभव केला. तर दुसऱ्या टेबलवर क सोंगट्या घेऊन खेळताना गांगल तनिष ने सोहम देशपांडेला पराभूत केले तिसऱ्या टेबलवर खेळताना सम्यक कुलकर्णीने रूठे मोहगावकर ला बरोबरीत रोखले चौथ्या टेबलवर रोनक कोरेने साडेपाच गुणांची कमाई करताना परिपेल्ली सानवीला हरविले.
सातव्या फेरीअखेरील काही निकाल खालील प्रमाणे:-
1 इशान अर्जुन P Y (6) 1 – 0 विजयी विरुद्ध बालगुडे सर्वज्ञ (5)
2 देशपांडे सोहम (5) पराभूत विरुद्ध गांगल तनिष (5)
3 कुलकर्णी सम्यक (5 ½) अनिर्णित विरुद्ध मोहगावकर रुतम (5)
4 कोरे रोनक (4½) विजयी विरुद्ध परिपेल्ली सानवी (5)
5 उदगीर अनिरुद्ध सौरभ (4½) विजयी विरुद्ध हर्षवर्धन राजेश ओझा (4½)
6 श्रीमथ षण्मुख पोलरी (4½) पराभूत विरुद्ध पांडा स्वस्तिक (4½)
7 कोद्रे तीर्थ (4) पराभूत विरुद्ध श्री नंदकुमार भोंग (4)
8 पारस विकास शर्मा (4) पराभूत विरुद्ध मिश्रा प्रध्योत (4)
9 आर्यन अमित पाटील (4) पराभूत विरुद्ध मथियाझगन काविन (4)
10 मुचलंबे आरोही (4) विजयी विरुद्ध डायव्ह राजवीर (4)
14 वर्षाखालील गटात सातव्या फेरीअखेरील काही निकाल खालील प्रमाणे:-
1 बोरकर सृजन (5) अनिर्णित विरुद्ध 6 AIM अलौकिक सिन्हा (6)
2 इनामदार सार्थक (5) पराभूत विरुद्ध अद्विक अमित अग्रवाल (5)
3 झिड निओ (5) विजयी विरुद्ध माहूरकर आयुष (5)
4 सप्ते वेदांत तुषार (5) पराभूत विरुद्ध श्रेयस रवींद्र पाटील ( 4½)
5 भेंडे ओम (4½) पराभूत विरुद्ध बर्हाटे शौर्य( 4½)
6 पाटील आदित्य (4½) विजयी विरुद्ध पाटील आर्यन (4)
7 अग्रवाल ऋषिक (4) विजयी विरुद्ध कुलकर्णी देवेश (4)
8 अभिर राघवेंद्र नायक (4) पराभूत विरुद्ध दत्ता द्विजेश (4)
9 इंदलकर राजवीरसिंह (4) विजयी विरुद्ध अस्निकर वेदांग (4)
10 बाकलीवाल शर्वी (4) विजयी विरुद्ध पवारकर चैतन्य (4)
खुल्या गटातील सातव्या फेरी अखेरचे इतर निकाल खालील प्रमाणे
1 बुमीनाथन ललितादितायनार (6 ½) अनिर्णित विरुद्ध ( 5½) शेर्ला प्रथमेश
2 ओम नागनाथ लामकाने ( 5) विजयी विरुद्ध 5 पांढरे स्वप्नील
३ लोखंडकर रुषिकेश (५) पराभूत विरुद्ध (५) शेट्टी मुरुगन
४ हेरंब हरीश इंगळे (५) पराभूत विरुद्ध (५) अविरत चौहान
5 बाकलीवाल गौरव (4½) विजयी विरुद्ध 4½ शिरगिरे प्रथमेश
6 बाभुळगावकर चंद्रकांत (4½) पराभूत विरुद्ध (4½) विकास आर शर्मा
7 खत्री चिराग (4½) अनिर्णित विरुद्ध (4½) अडणवाले सिद्धिक
८ देशपांडे आर्यन (४) विजयी विरुद्ध (४) गुरव अथर्व
9 आर्य पाटील (4) विजयी विरुद्ध (4) जैन यश
10 पाटील आदर्श (4) पराभूत विरुद्ध (4) सुरु नंदकुमार
विजेतेपद पटकाविणाऱ्या खेळाडूंना भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर शहराध्यक्ष मा.श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी शंकर भाऊ म्हणाले की स्पर्धेला लहान मुलांची संख्या बघून नरेंद्र मोदी यांचे 2050 मधील महासत्तेचा स्वप्न युवकांच्या रूपात पूर्ण होईल. विजय झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या व जे मुलं जिंकू शकली नाहीत अशा मुलांना खचून न जाता अजून कष्ट करून पुढच्या स्पर्धेला तयारी करून घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आज दिवसभर चाललेल्या स्पर्धेला पालकांनीही मुलांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी दिवसभर हजेरी लावली. त्यांचेही विशेष आभार त्यांनी मानले. यावेळी भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर शहराध्यक्ष मा.श्री. शंकरभाऊ जगताप, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, माजी नगरसेविका आरती चोंधे, मा.स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, भारतीय जनता युवा मोर्चा सरचिटणीस व मा.स्वीकृत सदस्य दिनेश यादव, भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, शिवराज लांडगे, भारतीय जनता युवा मोर्चा भोसरी-चऱ्होली मंडल अध्यक्ष उदयभाऊ गायकवाड, भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभाग संयोजक दिगंबर गुजर, भाजपा नेते सचिनभाऊ साठे, भुलेश्वरशेठ नांदगुडे, काळुराम नांदगुडे, रामदास कस्पटे आदी मान्यवर उपस्थित होते.