शबनम न्युज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील मनसे चे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी शहरातील 328 गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या या वेळी सालाबाद प्रमाणे यावर्षीही गणपतीचे आगमन मोठ्या जल्लोषात पिंपरी चिंचवड शहरामध्ये करण्यात आले , अनेक मंडळीनी समाजासमोर असणारे विविध समस्या व त्याचप्रमाणे ऐतिहासिक, सामाजिक,सांस्कृतिक, असे देखावे सादर केले होते, सर्व मंडळांनी समाजप्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणात केले, शहरातील सर्व गणेश मंडळाचे व गणेश भक्तांचे मनापासून हार्दिक अभिनंदन अशा शुभेच्छा दिल्या
यावर्षी शहरातील विविध भागांमध्ये , निगडी, पिंपरी,दापोडी, भोसरी, सांगवी, रावेत, किवळे, पुनावळे, बोपखेल, अशा सर्व गणेश मंडळाने आरतीचा मान दिला यावर्षी 328 गणेश मंडळा ना भेटी दिल्या सर्व ठिकाणी भक्तिमय वातावरण व जल्लोष, होता
सचिन चिखले यांनी सांगितले कि आज अनंत चतुर्थी गणपतीचे आगमन होऊन दहा दिवस पूर्ण झाले , सर्व ठिकाणी गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली दिसते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन घाटाची चांगली तयारी करण्यात आलेली आहे , पोलीस प्रशासन व सर्व संघटनेच्या स्वयंम सेवक गणपती मध्ये चांगले काम केलेले आहे त्यांचाही मनापासून हार्दिक अभिनंदन व आभार
गणेशा चरणी एवढीच प्रार्थना पिंपरी चिंचवड शहराला लवकरात लवकर रोज पाणी मिळो व या शहरातील सर्व नागरिकांना चांगले आरोग्य मिळो व सर्वांना सुरक्षित ठेव