शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी उप आयुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य मारुती भापकर आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.