शबनम न्युज | आळंदी
मध्ये सराईत मोटरसायकल चोरट्यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या चोरीच्या तीन मोटरसायकली आळंदी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी केळगाव मधील दिलीप कांताराम मुंगसे यांनी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये त्यांची मोटरसायकल चोरी बाबत फिर्याद दिली होती. चोरीस गेलेली होंडा एचएफ डीलक्स मोटर सायकल एम.एच14 के झेड १३१७ ही गाडी काळ्या रंगाचा शर्ट निळसर रंगाची पॅन्ट घातलेल्या व्यक्ती आळंदी मळकट रस्त्यावरील धानोरे फाट्यावर फिरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
Advertisement
धर्मेंद्र सुखसिंह धुर्वे (वय 23,रा. चाकण जिल्हा पुणे) याच्याजवळ सापडली त्यानंतर आरोपीला अटक करून त्याच्याकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. याबाबत अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत.