शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव (आळंदी) जि.पुणे. या ठिकाणी कला,वाणिज्य व बी.बी.सी. (सी.ए.) अंतर्गत टी.वाय. बी. ए., टी. वाय. बी. कॉम. आणि टी.वाय. बी. बी. ए. (सी.ए.) च्या विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडन्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप बारी यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ संतोष चव्हाण – प्राचार्य जानकीदेवी ज्युनिअर कॉलेज व हॉटेल मॅनेजमेंट भोसरी यांनी हॉटेल मॅनेजमेंट या कोर्स संदर्भात विविध ठिकाणी कशा महत्त्वपूर्ण संधी आहेत या संदर्भात विवेचन करून फूड बिवरेज सर्विस, फूड प्रोडक्शन संधी, ऍविएशन इंडस्ट्री, क्रूस इंडस्ट्री, रिटेल इंडस्ट्री तसेच MNC कंपन्यामध्ये कशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून त्यासाठी विविध कोर्सेस पूर्ण करून जॉबसाठी कसे परिपूर्ण ठरू शकतो यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पांडुरंग मिसाळ यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये करिअरच्या विविध संधी असून त्या तत्परतेने ओळखता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार नियोजन केले तर जीवनात यश नक्कीच मिळते अशी मत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार, मयूर मुरलीधर ढमाले व प्रशासकीय संचालक, प्रा. राजीव पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी प्रा. निलेश जगताप, प्रा. सौ संध्या साबळे, प्रा.संजीव कांबळे, डॉ.छाया जोशी,प्रा.सविता मानके, प्रा.परमेश्वर भत्ताशे, प्रा.शाहूराज येवते, प्रा. रोहित कांबळे, प्रा.महेश म्हसागर, प्रा.यशोदा आनेराव, प्रा. दिपाली ताम्हाणे , प्रा.सोनाली अभंग, प्रा.माधुरी चौधरी, प्रा. पूजा खवले, प्रा.पूजा मिटकरी,डॉ.समीना मोमीन, श्री.प्रवीण भावे, सौ. वर्षा ताजणे व कला, वाणिज्य व बी.बी.सी. (सी.ए.) तृतीय वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलास अस्तरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ समीना मोमीन यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली असे माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.